मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा आहेत. शिंदेंनी घेतलेले काही निर्णयाच्या चौकशीचे आदेश देत देवेंद्र फडणवीस यांनी जुनू काही याला दुजोराच दिला आहे. मंत्रांनी आपल्या मर्जीतील पीए आणि ओएसडी यांची नावे मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती, त्यामधील अनेक नावे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी दिलेली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १६ नावांवर फुली मारली, त्यामधील बहुतांश नावे शिंदेंच्या सेनेकडून आल्याचं समजतेय. यावरूनच सामनाच्या अग्रलेखात ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे. अग्रलेखामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करायला विसरले नाहीत. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे शैलीमध्ये टीकेची झोड उडवली आहे. फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल, असा सल्ला फडणवीसांना दिला आहे. या अग्रलेखात नेमके कोण कोणते मुद्दे उपस्थित केलेत, ते पाहूयात..
'मागच्या ३ वर्षात भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता. पण राज्यात शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलत आहेत. एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टचार केल्याचा आरोपही अग्रलेखात करण्यात आला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक आणि खऱ्या शिवसेनिकांना विकत घेण्यासाठी आणि नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, नगरविकास खात्याची लूट करून जमा केला गेलाय. हा लुटीचा पैसा खिशात पडावा यासाठी अनेकांनी पक्षांतर केलं'.
'पैशांचा प्रवाह आला कुठून? बेकायदेशीर टेंडर्स, बनावट कामं, निधीवाटपातील कमिशनबाजी, गृहनिर्माणातील दलाली, भूखंड घोटाळा, 'आशर' मार्गानं पैसा जमा झाला. शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा.लि. हे १० हजार कोटी रूपये घेऊन दुबईत पळाला आहेत', असा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय.
शिंदे अन् त्यांच्या लोकांची दणादण
'५०० कोटींचं टेंडर ३ हजार कोटींपर्यंत वाढवायचे, त्यातील मधले हजार कोटी काम सूरू होण्याआधीच ताब्यात घ्यायचे. त्यातील शे-दोनशे कोटी चेल्यांमध्ये वाटायचे. नंतर सगळ्यांना घेऊन प्रयागतीर्थी गंगास्थान घडवायचे. या सगळ्या कारनाम्यांना बूच लावण्याचं काम फडणवीस यांनी सुरू केलंय. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या लोकांची दणादण उडाली' असल्याचं ठाकरेंच्या शिवसेननं आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे.