Indrajit Sawant Threat Case: प्रशांत कोरटकरांनीच इंद्रजित सावंत यांना दिली धमकी, मोबाईल CDR वरून फोन केल्याचं स्पष्ट
Saam TV March 01, 2025 04:45 PM
पराग ढोबळे, नागपूर

इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून दिलेल्या धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर यांनीच आपल्या फोनवरून फोन करून इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी काढलेल्या कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रशांत कोरटकर यांनी आवाज मार्फ केल्याचा दावा खोटा असल्याचे समोर केले असला तरी फरार का? असा प्रश्न आता शिवप्रेमी विचारत आहे.

इंद्रजित सावंत यांना धमकीसह छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर आता नागपुरातील बेलतरोडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाज आक्रमक झाला असून प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूरनंतर आता नागपूरामध्ये देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलिस नागपुरात गेल्या २ दिवसांपासून तळ ठोकून आहेत. प्रशांत कोरटकर यांचा लोकेशन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहेत यासोबतच बेलतळी पोलिसांची ३ वेगवेगळे पथके मध्य प्रदेशसह संशय असलेल्या भागात जाऊन शोध घेत आहे. प्रशांत कोरटकर मुंबई, इंदोरसह वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. सायबर पोलिसांच्या माध्यमातून प्रशांत कोरटकर यांचा शोध पोलिस घेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात आज नागपुरात सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने निषेध बाईक रॅली काढण्यात येणार आहे. प्रशांत कोरटकर असो की राहुल सोलापूरकर असो यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज, जिजामाता यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी बाईक रॅली काढली जाणार आहे. नागपूर येथील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून निषेध नोंदवत बाईक रॅली काढली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.