Hyperloop Test Track : देशांतर्गत प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पातील नवी अपडेट समोर आली आहे. आयआयटी मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला आहे. हायपरलूपद्वारे तासाला १,००० किमी प्रवास करणे शक्य होणार आहे. या तंत्रामुळे दिल्ली ते जयपूर हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत करणे शक्य होणार आहे. ही हायपरलूप प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या...
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेच्या मदतीने आयआयटी मद्रासद्वारे हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात यश मिळवले आहे. या ट्रॅकची लांबी ४२२ मीटर इतकी आहे. व्यावसायिक वाहतुकीसाठी ५० किमीचा कॉरिडॉर तयार करण्याचा शासनाचा विचार आहे. हा जगातील सर्वात लांब हायपरलूप ट्रॅक असू शकतो असे म्हटले जात आहे.
१. हायपरलूप टेस्ट ट्रॅक आयआयटी मद्रासच्या परिसरात स्थित आहे. या ट्रॅकची लांबी ४२२ मीटर आहे.
२. हायपरलूप तंत्रामुळे ताशी १,००० किमी प्रवास करता येणार आहे. यामुळे ३५० किमीचा प्रवास अर्ध्या तासात करता येणार आहे.
३. हायपरलूप तंत्रामध्ये व्हॅक्यूम ट्यूबमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पद्धतीने पॉड्स तरंगतात. यात घर्षण आणि हवेचा प्रतिरोध दूर होतो.
हायपरलूप तंत्र कशा प्रकारे काम करते?
हायपरलूप तंत्रामध्ये कॅप्सूल किंवा पॉड्स या व्हॅक्यूम ट्यूबच्या माध्यमातून प्रवास करता येतो. व्हॅक्यूम ट्यूब या लांब, बंद आणि कमी हवेच्या दाबाच्या नळ्या असतात. यामुळे हवेचा प्रतिकार कमी होतो. परिणामी जास्त वेग मिळवता येतो. चुंबकीय उत्सर्जन किंवा एअर बेअरिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने पॉड्स घर्षणाशिवाय ट्रॅकवर धावते.
हायपरलूपमुळे देशातील मोठ्या शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. उदाहरणार्थ, ते जयपूर प्रवास करायला ५ ते ६ तास लागतात. तोच प्रवास आता ३० मिनिटांमध्ये पूर्ण होईल. किंवा प्रवास करण्यासाठी ३-४ तास लागतात, ते अर्ध्या तासांहून कमी वेळात करणे शक्य होणार आहे.