Swargate Rape Case: स्वारगेट प्रकरणात आता असीम सरोदेंची एन्ट्री! पीडित महिलेची बाजू कोर्टात मांडणार
esakal March 03, 2025 07:45 PM

Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात अॅड. असीम सरोदे यांची एन्ट्री झाली आहे. पीडित महिलेची बाजू ते कोर्टात मांडणार आहेत. त्यामुळं आत्तापर्यंत या प्रकरणात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत असताना ते आता रुळावर येण्याची शक्यता आहे.

असीम सरोदे यांनी याप्रकरणी पीडितेची बाजू समजून घेण्यासाठी या महिलेची भेटही घेतली आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यानुसार, आता पुढील सुनावणीला असीम सरोदे पीडित तरुणीची बाजू कोर्टात मांडणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.