IPPB Jobs 2025: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने बँकेत चांगली सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध केली आहे. IPPB ने सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह (Circle Based Executive) पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया 1 मार्चपासून सुरु झाली आहे. ज्यामध्ये पात्र उमेदवार 21 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. हा अर्ज तुम्हाला आयपीपीबीची अधिकृत वेबसाइट www.ippbonline.com वरून भारत येऊ शकतो.
IPPB भरतीसाठी राज्यानुसार रिक्त जागाछत्तीसगड - 3, आसाम - 3, बिहार - 3, गुजरात - 6, हरियाणा - 1, जम्मू - कश्मीर - 2, , गोवा - 4, नॉर्थ ईस्ट क्षेत्र - 20, पंजाब - 1, राजस्थान - 1, उत्तराखंड - 2, उत्तर प्रदेश - 1, तमिलनाडु -पुद्दुचेरी, केरळ - 4, एकूण - 51
IPPB भरतीसाठी पात्रता- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
- संबंधित राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत भरती अधिसूचना डाउनलोड करून पाहू शकतात.
IPPB भरतीसाठी वयोमर्यादाया बँक भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2025 च्या आधारावर मोजली जाईल.
पगार30,000/- रु. प्रति महिना
निवड प्रक्रियाया भरतीसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या पदवीतील गुणांच्या आधारावर तयार केलेल्या मेरिट लिस्टद्वारे थेट केली जाईल, कोणतीही परीक्षा होणार नाही. मात्र, अंतिम निवड मुलाखतीनंतर होईल.
अर्ज शुल्कSC/ST/PWD उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे.
नोकरीचा कालावधीही भरती कंत्राटी आधारावर केली जात आहे. सुरुवातीचा करार 1 वर्षाचा असेल, जो आवश्यकतेनुसार 2 वर्षांपर्यंत वाढवता येईल. मात्र, एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षे असेल.
नोटउमेदवार फक्त एका राज्यासाठीच अर्ज करू शकतो. अधिक माहितीसाठी IPPB ची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.