Axar Patel's Prank on Virat Kohli : भारतीय संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांना आता ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या विजयानंतर, संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी 'सामन्याचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक' पुरस्कार जाहीर करण्यासाठी संघाच्या सहाय्यक उदेनका नुवान सेनेविरथ्ने यांना आमंत्रित केले. परंतु, पुरस्कार देण्याच्या वेळी पदक गायब असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ उडाला होता. ड्रेसिंग रुमचा हा व्हिडीओ BCCI ने पोस्ट केला आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४९ धावा केल्या. श्रेयस अय्यर ( ७९), अक्षर पटेल ( ४२) व हार्दिक पांड्या ( ४५) यांनी चांगला खेल केला. किवींच्या मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवर बाद झाले. कर्णधार केन विलियम्सनने ८१ धावांची खेळी करून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले.वरुण चक्रवर्थीने ५ विकेट्स घेतल्या.
या सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये फिल्डिंग मेडल देण्याचा कार्यक्रम झाला. पण यावेळी अक्षर पटेलने गंमत म्हणून ते पदक लपवले होते. विराट कोहलीपासून सारेच ते पदक शोधायला लागले. कर्णधार मस्तीच्या मूडमध्ये दिसला. अक्षरच्या या खोडीमुळे सर्व खेळाडूंमध्ये हशा पिकला. कोहलीला 'सामन्याचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक' म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे भारताच्या विजयात मोलाचा वाटा होता.
या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अक्षर पटेलचे खोडकरपणा आणि विराट कोहलीचे हसतमुख प्रतिक्रिया दिसल्या. या घटनेमुळे संघातील खेळाडूंच्या मैत्रीपूर्ण नात्याची झलक पाहायला मिळते. भारताचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचा विक्रम विराटने नावावर केला. त्याने एकूण ३३४ झेल टिपताना राहुल द्रविडचा ( ३३३) विक्रम मोडला. मोहम्मद अझरुद्दीन ( २६१), सचिन तेंडुलकर ( २५६) व रोहित शर्मा ( २२९) हे सर्वाधिक झेल घेणारे अव्वल पाच भारतीय खेळाडू आहेत.