"कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष असूनही शिवकुमार यांनी राष्ट्रीय स्तरावर पक्षासाठी आव्हानात्मक काळातही अथक परिश्रम केले आहेत."
बंगळूर : कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण हा एक ‘मिटवलेला विषय’ आहे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते वीराप्पा मोईली (Veerappa Moily) यांनी रविवारी म्हटले; मात्र त्यांच्या या वक्तव्याने (Congress) उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
मोईली म्हणाले होते की, शिवकुमार मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, ही केवळ काळाची गरज आहे. कारण असे काहीतरी घडणारच आहे. शिवकुमार यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पहिल्याची उमेदवारी देण्यासाठी मीच प्रयत्न केले. आज ते कर्नाटकातील एक यशस्वी नेते म्हणून उदयास आले आहेत. त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावे, अशी आपण सर्वांनी इच्छा करूया.
कारकळ येथे काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मोईलीनी नमूद केले की, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष असूनही शिवकुमार यांनी राष्ट्रीय स्तरावर पक्षासाठी आव्हानात्मक काळातही अथक परिश्रम केले आहेत आणि इतर राज्यांमध्येही पक्षाच्या सत्तेत वाढ होण्यास हातभार लावला आहे.
शिवकुमार यांच्या नेतृत्वाचे आणि संघटनात्मक प्रयत्नांचे कौतुक करताना, माजी केंद्रीय मंत्र्यांनी व्यासपीठावरच बसलेल्या शिवकुमार यांना उद्देशून म्हटले की, अनेक वक्तव्ये येऊ शकतात आणि जाऊ शकतात; परंतु तुम्हाला मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. जर कोणी टीका करत असेल तर ते त्यांच्या समाधानासाठी असे करू शकतात; परंतु शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे पद कोणाकडून मिळालेले दान नाही; ते त्यांनी स्वतःसाठी मिळवलेले आहे.
त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचे श्रेय त्यांच्या समर्थकांसह कोणीही घेण्याची गरज नाही. असंख्य प्रयत्न करूनही कोणीही हे होण्यापासून रोखू शकणार नाही. शिवकुमार यांचे मुख्यमंत्री होणे अटळ आहे. मे २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली. काँग्रेस नेतृत्वाने अखेर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास राजी केले.