युपी वॉरियर्सचं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १५१ धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
GH News March 07, 2025 12:10 AM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या १६ व्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात युपी वॉरियर्ससमोर मोठी धावसंख्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण युपी वॉरियर्स फार काही करू शकली नाही. युपी वॉरियर्सने २० षटकात ९ गडी गमवून १५० धावा केल्या. तसेच विजयासाठी १५१ धावांचं आव्हान दिलं आहे. स्पर्धेतील इतर निकाल पाहता युपी वॉरियर्सने विजयासाठी दिलेलं आव्हान मुंबई इंडियन्स सहज गाठेल असंच वाटत आहे. युपी वॉरियर्सला ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वोल या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने ७४ धावांची भागीदारी केली. ग्रेस हॅरिस २८ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली किरण नवगिरे काही खास करू शकली नाही. तिला आपलं खातंही खोलता आलं नाही. कर्णधार दीप्ती शर्माने जॉर्जिया वोलला चांगाली साथ दिली. पण ती ५५ धावा करून बाद झाली. तिने ३३ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजांची रांगच लागली. वृंदा दिनेश १०, चिनले हेन्री ६, श्वेता सेहरावत ०, उमा छेत्री १ अशा धावा करून बाद झाले.

मुंबई इंडियन्सकडून एमेलिया केरने सर्वात चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर हेली मॅथ्यूजने ४ षटकात फक्त २५ धावा देऊन २ गडी बाद केले. नॅट स्कायवर ब्रंट आणि परुणिका सिसोदिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.

यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.