बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख मार्क कार्नी किमान सध्यासाठी कॅनडाचे नवे पंतप्रधान असणार आहे.
जागतिक आर्थिक संकटांचा सामना करण्याबाबतचा त्यांचा अनुभव त्यांना कामी येऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सुरू झालेल्या व्यापार युद्धाचा त्यांना सामना करावा लागणार आहे.
मार्क कार्नी 2013 मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनले होते. त्यावेळी या बँकेचा 300 वर्षांचा ऐतिहासिक वारसा त्यांनी सांभाळला होता.
ब्रिटनच्या सर्वात मोठ्या बँकिंग पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते तिथली केंद्रीय बँक, बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून महामंदीच्या काळात आर्थिक क्षेत्रात नेतृत्व केलं होतं.
पण पंतप्रधान पदाच्या बहुतांश उमेदवारांच्या उलट, कार्नी यापूर्वी कोणत्याही राजकीय पदावर राहिलेले नाहीत. तरीही त्यांनी मावळते पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचं स्थान मिळवण्यासाठीची निवडणूक सहजपणे जिंकली.
पण आता देशाला सर्वात मोठ्या संकटातून बाहेर काढण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. ते म्हणजे सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धातून बाहेर काढण्याचं आव्हान.
त्याचवेळी पंतप्रधान म्हणून भूमिका पार पाडणं हेही तेवढंच मोठं आव्हान असेल. कॅनडातील पुढची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
पण या निवडणुका या महिन्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कार्नी हे जगभरात फिरले आहेत. न्यूयॉर्क, लंडन आणि टोकियोसारख्या ठिकाणी त्यांनी गोल्डमन सॅक्ससाठी काम केलं आहे. पण त्यांचा जन्म उत्तर-पश्चिम भागातील उत्तरेचं शहर फोर्ट स्मिटमध्ये झाला होता.
त्यांचे वडील हायस्कूल प्रिन्सिपल होते. शिष्यवृत्ती मिळवत ते हार्वडला शिकण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी सर्वाधिक कॅनडियन खेळ खेळले. त्यात आइस हॉकीचाही समावेश असेल. 1995 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली होती.
2003 मध्ये त्यांनी खासगी क्षेत्रातील नोकरी सोडली आणि बँक ऑफ कॅनडामध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणून रुजू झाले. त्यानंतर अर्थ विभागात ज्येष्ठ असोसिएट डेप्युटी मिनिस्टर म्हणून त्यांनी काम केलं.
2007 मध्ये त्यांना बँक ऑफ कॅनडाच्या गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आलं. देशाला मंदीत ढकलणाऱ्या जागतिक बाजारातील घसरणीच्या काही काळापूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय बँकेतील त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जातं. कारण देशाला सर्वात मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली होती.
केंद्रीय बँकर अत्यंत सतर्क राहतात. तरीही त्यांनी व्याजदरांमध्ये नाटकीय पद्धतीनं कपात केल्यानंतर किमान एका वर्षापर्यंत नीचांकी ठेवण्याचा विचार त्यांनी खुलेपणानं बोलून दाखवला.
या पावलामुळं बाजारातील घसरणीनंतरही व्यवसायांमध्ये गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी मदत करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं.
बँकेच्या थ्रेडनीडल स्ट्रीट मुख्यालयातील कार्यकाळादरम्यान त्यांनी संस्थेतील कामकाजात अनेक बदल अनुभवले. कार्यकाळाच्या सुरुवातीला बँकेनं आर्थिक सेवा प्राधिकरण बंद केल्यानंतर त्यांनी आर्थिक नियमनाची जबाबदारी स्वीकारली.
बँकेच्या आधुनिकीकरणाचं श्रेयही त्यांना दिलं जातं. तसंच ते आधीच्या तुलनेत आता माध्यमांमध्येही जास्त झळकू लागले आहेत.
त्यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा व्याजदर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर होते. पण त्यांनी 'फॉरवर्ड गायडन्स' चं धोरण अवलंबलं. त्याअंतर्गत बँकेच्या अर्थव्यवस्थेला आणखी पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर बेरोजगारी दर 7% च्या खाली येईपर्यंत व्याजदर न वाढवण्याचं वचन देत कर्ज देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल.
2011-18 पर्यंत कार्नी हे आर्थिक स्थैर्य बोर्डाचे अध्यक्ष होते. त्याद्वारे जगभरातील नियामक प्राधिकरणांशी समन्वय साधला जात होता. त्यावेळी त्यांना ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून धोरणांबाबत जागतिक संबंधात महत्त्वाची भूमिका मिळाली होती.
कार्नी जी-20 बैठकांमध्येही नियमितपणे सहभागी होत होते. तसंच जागतिक व्यासपीठांवर त्यांना ट्रम्प यांच्याबाबत मतं विचारली जात होती.
त्यांना पर्यावरणातील स्थैर्यासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणूनही ओळखलं जातं.
2019 मध्ये ते हवामान बदलासंदर्भातील संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत बनले आणि 2021 मध्ये त्यांनी नेट झिरोसाठी ग्लासगो आर्थिक आघाडीची सुरुवात केली. हा हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या बँक आणि आर्थिक संस्थांचा समूह आहे.
कार्नी यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांबाबत अनेक वर्षांपासून चर्चा केल्या जातात. पण नुकत्याच त्यांनी या चर्चा फेटाळल्या होत्या.
पण जानेवारी महिन्यात ट्रुडो यांनी राजीनामा दिल्यानंतर परिस्थिती बदलली. पक्षात वादंग सुरू झाला आणि ट्रुडो यांच्या निवडणूक निकालात घसरण झाल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला.
काही रिपोर्ट्सनुसार ट्रुडो यांना फ्रीलँड यांच्याऐवजी कार्नी यांची नियुक्ती करायची होती.
फ्रीलँड ट्रुडो यांच्या विरोधात पद मिळवण्याच्या स्पर्धेत होते. पण कार्नी यांनी मतांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवला. त्यांनी ट्रम्पचा सामना करण्यासाठी आपणच सर्वोत्तम उमेदवार असल्याचं म्हटलं. त्यांनी कॅनडाच्या वस्तुंवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफही लावलं.
गेल्या महिन्याच्या अखेरीस चर्चेमध्ये कार्नी म्हणाले होते की, "संकटांचा सामना कसा केला जातो, हे मला माहिती आहे.अशा स्थितीमध्ये तुम्हाला याचा अनुभव असणं गरजेचं असतं. चर्चेचाही अनुभव असणे गरजेचे असते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)