Rangpanchami Special Recipe बदाम दूध थंडाई
Webdunia Marathi March 10, 2025 06:45 PM

साहित्य-

एक लिटर - बदाम पासून बनवलले दूध

दहा - भिजलेले बदाम

दहा -काजू

एक टेबलस्पून - खसखस

एक टेबलस्पून - बडीशेप

चार -काळी मिरी

दोन- हिरव्या वेलची

एक - दालचिनीचा छोटा तुकडा

एक टेबलस्पून - गुलाबजल

एक टेबलस्पून - मध किंवा गूळ

पाच - दुधात भिजवलेले केशर धागे

एक टेबलस्पून - चिया बियाणे

बर्फाचे तुकडे

ALSO READ:

कृती-

सर्वात आधी भिजवलेले बदाम, काजू, खसखस, बडीशेप, काळी मिरी, वेलची आणि दालचिनी यांचे थोडे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. आता ही पेस्ट बदामाच्या दुधात घाला आणि चांगले मिसळा. तसेच गुलाबजल, मध किंवा गूळ आणि केशर यांचे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा. चव आणखी वाढवण्यासाठी, तुम्ही ते फ्रीजमध्ये १-२ तास थंड करू शकता. तसेच सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला, वर चिया बिया शिंपडा आणि बर्फाच्या तुकड्यांसह सजवा. तर चला तयार आहे आपली रंगपंचमी विशेष बदाम दूध थंडाई रेसिपी.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ:

Edited By- Dhanashri Naik


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.