Mumbai MHADA: मुंबईत १२ लाखांत पूर्ण होणार घराचं स्वप्न; ४,७०० घरांसाठी लॉटरी, सोमवारपासून अर्ज करता येणार
Saam TV March 16, 2025 08:45 PM

MHADA Lottery News Update : मुंबईत स्वत:च्या मालकीचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. पण घराची किंमत आवाक्याबाहेर असल्यामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहते. पण बीएमसी कर्मचाऱ्यांचे घर खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. आता १२ लाखांत आपल्याला स्वत: चे घर खरेदी करता येणार आहे.

तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या माहुल परिसरात ४,७०० घरे बांधण्यात आली आहे. या घरांची किंमत १२ लाख ६० हजार रूपये इतके असून, ही घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली जाणार आहेत. या घरांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सोमवारपासून अर्ज करता येणार आहे.

माहुलमधील तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त घरांना गेल्या काही दिवसांत खरेदीदार मिळाले नाहीत. त्यामुळे बीएमसी म्हडाच्या मार्फत या घराची लॉटरी काढणार आहे. अनेक दिवसांपासूना रिक्त असणाऱ्या या सदनिकांच्या देखभालीचा खर्च पालिकेला करावा लागतोय. त्यामुळे या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्वावर विकण्याचा निर्णय घेतलाय.

एमएमआरडीएनं प्रकल्पबाधितांसाठी इमारती बांधून त्यातील सदनिकांचे हस्तांतरण महापालिकेला केले. विविध विकास प्रकल्पांमध्ये घर बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना माहुल येथील राहण्यासाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.

या इमारतीच्या संकुलात शाळेसह रूग्णालय आणि इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जर कर्मचाऱ्यांना हे घर विकायचे असल्यास ५ वर्षांनंतर कधीही विकू शकतात. यासाठी सोमवारपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.