सपकाळ यांच्यावर गुन्हा नोंदवा!
esakal March 18, 2025 01:45 AM

सपकाळ यांच्यावर गुन्हा नोंदवा!
प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (ता. १७) विधान परिषदेत केली.
सकपाळ यांनी फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे सोमवारी विधान परिषदेत पडसाद उमटले. या वेळी दरेकर यांनी हा फडणवीस यांचा व्यक्तिगत अपमान नाही, तर महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारे राज्य असून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबतचे हे बेजबाबदार विधान आहे. सभागृहाने याबाबत गंभीर दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करावी किंवा त्यांना समज द्यावी. त्यांचे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही दरेकर म्हणाले. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी शासनाने गंभीर दखल घेतली असून नियमानुसार कारवाई होईल, असे सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.