एचपीकडून नेक्स्ट-जेन एआय कमर्शियल संगणक बाजारात
नवी दिल्ली, ता. १७ : एचपीने आपले नव्या श्रेणीतील नेक्स्ट-जेन एआय कमर्शियल संगणक सोमवारी (ता. १७) लाँच केले. या एआय संगणकाची रचना उद्योग व व्यावसायिकांच्या बदलत्या गरजांनुरूप काम करण्यासाठी करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. या उत्पादनांमध्ये एचपी एलिटबुक अल्ट्रा जी१आय १४ इंच, एचपी एलिटबुक एक्स जी१आय १४ इंच आणि एचपी एलिटबुक एक्स जी१आय फ्लिप १४ इंच मॉडेल्सचा समावेश आहे.
एचपी या नव्या संगणकाना इंटेल कोअर अल्ट्रा प्रोसेसर्सनी ऊर्जा मिळाली असून, त्यात न्यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे; जो प्रति सेकंद ४८ ट्रिलियन्स ऑपरेशन्स हाताळू शकतो. याशिवाय एचपीने एलिटबुक एक्स जी१ए १४ इंच नोटबुक भारतात लाँच केला असून, त्यातील एएमडी रायझेन प्रोसेसर्स व आपल्या एनपीयू उद्योगातील आघाडीची ५५ टॉप्स कामगिरी देतात. एचपीची ही उत्पादने अत्यंत हलकी डिझाइन्स, दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीज आणि शक्तिशाली परफॉर्मन्स उत्तम मल्टीटास्किंग करतात आणि कंटेंट निर्मिती व डेटा ॲनालिसिससारखी कामगिरीवर आधारित कार्यात सर्वोत्तमता देतात, असा कंपनीचा दावा आहे. एचपी इंडियाचे पर्सनल सिस्टीम्सचे वरिष्ठ संचालक विनीत गेहानी यांनी सांगितले, की २०२५ हे वर्ष एआय कॉम्प्युटरच्या अंगीकारातील एक महत्त्वाचा काळ आहे. यातून तंत्रज्ञान काम आणि नावीन्यपूर्णतेला कशा प्रकारे पाठबळ देते हे दिसून येते. एचपीमध्ये आम्ही एआय पीसी उत्पादकता आणि समन्वयातील पुढील मोठा टप्पा पार करीत असल्याच्या बाबींवर विश्वास ठेवतो. आमची एलिटबुक उत्पादने कार्यक्षमता उत्तम करणे, सुरक्षा वाढवणे आणि भविष्याच्या गरजांसाठी वैयक्तिकीकृत अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. अद्ययावत एआय, नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये आणि शाश्वत नावीन्यपूर्णतेचा समावेश करून ही उपकरणे उद्योगात एक नवीन मानक स्थापित करीत आहेत.