-rat१७p२७.jpg-
२५N५१७८२
रत्नागिरी ः पोदार स्कूलमध्ये प्रयोगांचे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी.
-----
‘पोदार’मध्ये शिक्षणदायी प्रयोगांचे प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ ः कारवांचीवाडी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने ने द एक्सपेरिमेंटेरियम हा एक अभिनव कार्यक्रम आयोजित केला. पहिली ते सहावीतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने भाग घेतला. ज्यामुळे त्यांच्यात तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि शास्त्रज्ञ असण्याची आवड वाढली.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांच्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता वाढवणे आणि त्यांना या क्षेत्रातील मुलभूत तत्त्वे शिकवणे होते. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध आकर्षक आणि शिक्षणदायी प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रयोगांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित यांसारख्या क्षेत्रांमध्ये मुलभूत सिद्धांत आणि विचारांच्या महत्त्वाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना केवळ प्रयोग पाहण्याचीच संधी नाही, तर त्यांना या प्रयोगांची प्रतिकृती तयार करण्याची संधी मिळाली. शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांना निरीक्षण पत्रिका दिली गेली, ज्यामध्ये त्यांनी प्रयोगाच्या प्रक्रियेची निरीक्षणे, त्यांच्या शिकण्याची पद्धत, आणि प्रयोगांचे परिणाम नोंदवले. मुख्याध्यापक राकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.