Vidhan Parishad Election 2025 : विधानपरिषदेसाठी अखेर शिंदे गटाने जाहीर केला उमेदवार, कुणाला मिळाली संधी?
esakal March 18, 2025 03:45 AM

Vidhan Parishad Election eknath shinde faction candidate announced : विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वी आता शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटाचे विधानपरिषदेचे उमेदवार असणार आहेत.

रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत काम केलं आहे. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हा रघुवंशी यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, चंद्रकांत रघुवंशी आज दुपारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.