विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून तीन नावे जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याची माहिती आहे. नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होत आहे