तृप्ती देसाई आरोपी आणि पोलिसांचे संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. तर तृप्ती देसाईंना नोटीस बजावली होती. यानंतर आज तृप्ती देसाई नोटीसीला उत्तर देणार असून बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहेत.
Supriya Sule News : "आता 6 महिने थांबा, दुसरी विकेट पडणार", सुप्रिया सुळे यांच्या दाव्याने खळबळमहायुतीचे 100 दिवस होत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे सध्या महायुती बॅकफूटवर गेली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच "100 दिवसात महायुतीची एक विकेट गेली, आता 6 महिने थांबा, दुसरी विकेट पडणार", असा दावा केला आहे. यामुळे सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Bhonage News : मंदिरांवर 1000 तर मशीदींवर 300 भोंगेसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरातील सर्व धार्मिक प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचे पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यात मंदिरांवर 1000 तर मशीदींवर 300 भोंगे असल्याचे उघड झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश प्रमाणे बेकायदा भोंग्यांची माहिती संकलित करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले होते. यानंतर मंदिरांवर 1000 , 130 चर्च, 200 बौद्ध विहार, 300 मशीद, 150 दर्गा, 50 मदरशांवर भोंगे असल्याचे समोर आले आहे. पण पुणे शहरातील विविध प्रार्थनास्थळांवर 1830 भोंगे असल्याची माहिती पोलिसांकडे आहे.
Pune Congress News : पुण्यात काँग्रेसला गळती? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह 100 पदाधिकारी देणार राजीनामामहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य 100 पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. काहीच दिवसांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडली होती. तर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या घटनेनंतर आता येत्या 2 ते 3 दिवसात काँग्रेसला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. तर काही काही कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून ते पार्थ पवार यांना भेटल्याची चर्चा शहरात आहे.
State Cabinet meeting News : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकराज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार असून ती दुपारी 3 वाजता विधानभवनात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार असून या बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
FASTag News : फास्टॅग नाही, तर मग भरा एप्रिलपासून दुप्पट टोलमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनांना फास्टॅग सक्ती केली आहे. याविरोधात उच्च न्यायालयाने आव्हान देण्यात आले होते. मात्र ते न्यायालयाने फेटाळले आहे. यानंतर आता एमएसआरडीसीने फास्टॅग सक्तीच्या अंमलबजावणीला गती देताना मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. तर फास्टॅग नसेल तर टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत.
Ramdas Athawale News : 'झटका की हलाल, मुस्लिम सैन्या'वर आठवलेंनी राणेंना झापलं, म्हणाले, 'अत्यंत चुकीचे'भाजप मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते असे वक्तव्य करून राज्यात वाद निर्माण केला होता. हा वाद शांत होतो न होतो तोच त्यांनी झटका आणि हलाल वाद सुरू केला. या वादावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य करताना, नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत चिमटा काढला आहे.
Prashant Koratkar News : कोरटकरला जेल की बेल? आज जामीन अर्जावर सुनावणीछत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची प्रशांत कोरटकरने दिली होती. याप्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला जामीन मिळाला आहे. आज (ता.17) कोरटकरच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकर यांच्या जमिनीवर दुपारी दोन वाजता सुनावणी होणार असून जेल की बेल? याचा अंतिम फैसला होणार आहे.
DCM Eknath Shinde : "औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला?"सध्या राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असून त्याची कबर हटविण्याची मागणी होत आहे. याचमुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच शासनाच्यावतीने आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? जी शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.