डव्वा (जि. गोंदिया) - गोपाळटोळी येथील येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात नेऊन आरोपीने एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (ता. १७) दुपारी तीनच्या सुमारास घडली यातील आरोपी चंद्रशेखर उर्फ सोनू अशोक पटले (वय-२९, रा. गोपाळटोली) याला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे.
गोपाळटोली येथील बालिका सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आईस्क्रीम हातात घेऊन स्थानिक जिल्हा परिषद शाळेकडे शाळेच्या पटांगणावर खेळण्यास गेली होती. यावेळी जवळच असलेल्या चंद्रशेखर उर्फ सोनू अशोक पटले याने तिला शाळेच्या शौचालयात नेले व लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, पीडित बालिकेने घरी रडत येऊन आईला अत्याचाराबाबत सांगितले. त्यानंतर आई व तिच्या नातेवाईकांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली. आईच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.