दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian Death Case) नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे हायकोर्टात केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच आज सभागृहात दिशा सालियन प्रकरणातील आरोपींच्या अटकेची मागणीवरून गदारोळ झाला. आता या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बदनामीचा प्रयत्न होतच आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, मी तुम्हाला वारंवार सांगितले आहे, माझं तुम्ही ट्विट तुम्ही पाहिलं असेल किंवा आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही या सरकारला एक्स्पोज केले आहे. फक्त आम्ही नाही तर संघानी पण एक्सपोज केलं आहे. काल संघातले देखील लोक बोलले की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे. मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई मागणार का? आज आम्ही हाच प्रश्न विचारात आहे की, महाराष्ट्राला क्राइम्समध्ये कुठे नेऊन ठेवलेले आहे? महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच. पण त्याच सोबत माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या अधिवेशनातील भाषणामध्ये बोलताना भाजपचे किंवा या महाझुटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते, ज्याच्यावर निवडणूक जिंकले असते असे ते बोलतात, हे निवडणूक आयोगामुळे वोटर फ्रॉडमुळे जिंकले.
तरीदेखील जे काही त्यांचे दहा मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा या अर्थसंकल्पात आलेला नाही. त्यांना आम्ही एक्स्पोज केले. औरंगजेबावर एक्स्पोज केले आहे. एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला. हे सगळं झाल्यानंतर आपण पाहत आहे की, आज हाऊस बंद कशावरून पाडायचे तर माझ्यावरून पाडायचे. पण जनता सवाल विचारत आहे की, तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. तुम्हाला जर आम्ही निवडून दिले असेल तर तुम्हाला काम करायला निवडून दिलेले आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेले आहे. तुम्ही महाराष्ट्राबद्दल चर्चा करा. पाच वर्षापासून सातत्याने बदनामीचा प्रयत्न होतच आहे. कोर्टात उत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=npuoudumuyu
आणखी वाचा
अधिक पाहा..