होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली नवीन OBD2B-कंप्लायंट शाईन 100 बाईक भारतात लाँच केली आहे. याची सुरुवातीची किंमत 68,767 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही गाडी याच व्हेरियंटमध्ये 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक भारतभरातील HMSI डीलरशिपवर उपलब्ध आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की, ही बाईक स्टायलिश, किफायतशीर आहे आणि नवीन प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करते. एंट्री लेव्हल सेगमेंटमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.
HMSI ने आपली नवीन शाईन 100 बाईक ‘अमेजिंग शाइन ऑफ न्यू इंडिया’ या टॅगलाईनसह सादर केली आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये चांगली आणि स्टायलिश बाईक हवी आहे त्यांच्यासाठी ही बाईक खास डिझाइन करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक कमी पेट्रोलमध्ये जास्त चालेल आणि त्याचा मेंटेनन्स कॉस्टही कमी असेल.
लूक आणि डिझाइन
नवीन अपडेटेड होंडा शाईन 100 चे डिझाइन शाईन 125 पासून प्रेरित आहे. यात बॉडी पॅनेलवर नवीन ग्राफिक्स आणि होंडाचा लोगो देण्यात आला आहे. याचे आकर्षक फ्रंट काऊल, ब्लॅक अलॉय व्हील्स, अॅ ल्युमिनियम ग्रॅब रेल, लांब आणि आरामदायक सीट आणि स्लीक मफलर यामुळे हे आणखी स्टायलिश झाले आहे. ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ ऑरेंज, ब्लॅक विथ ग्रे आणि ब्लॅक विथ ग्रीन अशा 5 आकर्षक कलर ऑप्शनमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.
पॉवर आणि ब्रेकिंग-सस्पेंशन
नवीन होंडा शाईन 100 मध्ये 98.98 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे, जे नवीन ओबीडी 2 बी उत्सर्जन नियमांचे पालन करते. हे इंजिन 7500 RPM वर 7.28 हॉर्सपॉवर आणि 5000 आरपीएमवर 8.04 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. OBD2B म्हणजे ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक, सेकंड जनरेशन, भारत स्टेज आणि ही प्रणाली वाहनाच्या इंजिन आणि उत्सर्जन प्रणालीवर लक्ष ठेवते आणि काही समस्या असल्यास अलर्ट करते. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. ही बाईक हलक्या, पण मजबूत डायमंड टाईप फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ट्विन रियर शॉक अॅब्जॉर्बर आहेत. सुरक्षिततेसाठी यात दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक आणि सीबीएस देण्यात आली आहे.