-rat२१p१.jpg-
P२५N५२६०५
रत्नागिरी ः स्वा. सावरकर नाट्यगृहात लोककला प्रशिक्षण दरम्यान दशावताराचे धडे घेताना शिबिरार्थी विद्यार्थी सोबत कलाकार.
------
कोकणामधील विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘दशावतार’
लोककला प्रशिक्षण ; गोगटेमध्ये शिबिरात प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दशवतार लोककला प्रशिक्षण शिबिर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात सुरू आहे. गुरुवारी या शिबिरातील मुलांना रंगरंगोटी, वेशभूषा, प्रयोग तयारी व प्रात्याक्षिक येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाले.
सकाळी अकरावा वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात शिबिर व प्रात्यक्षिकाला सुरवात झाली. प्रथम उपस्थित शिबिरार्थी मुलांना दशावतार यांची माहिती देण्यात. तसेच शिबिरार्थी मुलांच्या विविध प्रश्नांची उकल करण्यात आली. लोककला प्रशिक्षणाला ३६ शिबिरार्थी उपस्थित होते. त्यानंतर दशावतार मंडळीने पेठारा तयार केला. त्यामध्ये गणपतीची सोंग, विविध लागणारी आयुध यांची पूजा, आरती केली. त्यानंतर एका रांगेत सर्व कलाकारांनी मुलांच्यासमोर आपली रंगभूषा-वेशभूषा तयार केली. सुधीर कलिंगण प्रस्तूत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या दशावतार नाट्याला सुरवात झाली. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले. सुर तालाच्या रंगलेल्या दशावतार नाट्यातील प्रत्यक्षात पाहिलेली व्यक्ती आणि त्यांनी साकारलेला अभिनय यांची चुणूक शिबिरार्थींना पाहायला मिळाली. यामध्ये दादा राणे-कोनसकर, निळकंठ सावंत, राजू हरियाण, राधाकृष्ण नाईक, काका कलिंगण, पप्पू घाडीगावकर, सुनील खोरजुवेकर, संजय लाड यांनी भूमिका साकारल्या. रंगतदार झालेल्या दशावतार नाट्याला संगीत साथ हार्मोनियम सत्यवान गावडे, पखवाजवर चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण यांनी केली.
याप्रसंगी रंगकर्मी दादा राणे-कोनसकर म्हणाले, भगवान परशुराम यांनी कोकणभूमी निर्माण केली. दशावतावराची निर्मिती कुणी कुठून आणली नाही तर तिचा जन्म कोकणातच झाला. देवालयात देवांच्या लीला दाखविणे म्हणजेच दशावतार. त्यामध्ये गणपती, संकासूर, विविध आयुधे आहेत. याचे स्तवन, गुणगान करण्याची परंपरा अनादिकालापासून सुरू आहे. दशावतारात कला सादर करणे एवढेच नाही तर याला मर्यादाही आहेत. त्या मर्यादाही कलाकारांना पाळाव्या लागतात.
या वेळी नेरुर (कुडाळ) येथील सुधीर कलिंगण प्रस्तूत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे सिद्धेश कलिंगण, रत्नागिरीतील रंगकर्मी प्रा. डॉ. आनंद आंबेकर, सांस्कृतिक संचालनालयाचे समन्वयक नंदकिशोर जुवेकर, ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता केळकर, अनुया बाम, राजेंद्र गोसावी, दीपक मांणगावकर, सिमा कदम यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.
---
संघटनात्मक व्यवस्थापन
सुधीर कलिंगण यांच्या ग्रुपने सादर केलेल्या दशावतार सादरीकरणासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर (महाविद्यालय) स्वायत्त रत्नागिरीचा पहिल्या वर्षाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक कलेचा अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या दशावतार प्रशिक्षणासाठी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि गोव्या पट्ट्यांमध्ये दशावतार सादर केले जाते. या कलेमधील अध्यात्मिकता आणि संघटनात्मक व्यवस्थापन दिसून येते हे आम्हाला आणि विद्यार्थ्यांना आवर्जून लक्षात आल्याचे प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांनी सांगितले.