Nagpur Clash: नागपूरमध्ये तणावपूर्व शांतता, पोलिस अलर्ट मोडवर; आरोपींना बेल की जेल? आज ठरणार
Saam TV March 21, 2025 09:45 PM

नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर आता तणावपूर्ण शांतता असली तरी रमजान महिना सुरू असल्याने शुक्रवारच्या नमाजला मुस्लिम धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे. आज नमाजच्या निमित्ताने पुन्हा एकदा मशिदीजवळ गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलाही अनुच्चित प्रकार घडणार नाही याकरिता नागपूर पोलिस अलर्ट मोडवर असणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज दिवसभर शहराचा आढावा घेतला जाणार आहे.

नागपूर शहरातील काही भागांमध्ये संचारबंदी उठली असली तरी अजूनही हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये कडक बंदोबस्त असणार आहे. तसंच शहरातील आणखी काही भागांमध्ये शांतता सुव्यवस्था असल्यास त्याचा आढावा घेऊन सुरू असलेली संचारबंदी आणखी शिथिल करता येते का? याचा सुद्धा आढावा आज दिवसभरात पोलिस आयुक्तांकडून घेतला जाणार आहे.

नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला आरोपींना न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज सर्व आरोपींची पोलिस कोठडी संपत असून पुन्हा एकदा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडून पोलिस कोठडी वाढविला जातो का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या घटनेतील मास्टर माईंड फहीम खानला सायबर पोलिस प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन चौकशी करणार का? तसेच फहिम खानवर आलेल्या आणखी काही वेगवेगळ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत दाखल गुन्ह्यात तपासत घेतात का? हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणातील आरोपींना बेल मिळते की जेल हे पाहणं महत्वाचे ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.