इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात झाली.
या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी ५ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने त्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात त्यांच्या संघातील नव्या खेळाडूंचे स्वागत झाले, तर काही खेळाडूंचे त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी गौरवही करण्यात आला.
यावेळी रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांना खास ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
चेन्नई सुपर किंग्सने या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात दिसते की धोनीकडून जडेजाचा ट्रॉफी देऊन सन्मान केला जात आहे. या ट्रॉफीमध्ये चॅम्पिटन्स ट्रॉफी आणि टी२० वर्ल्ड कप ट्रॉफी कोरल्याचे दिसत आहे.
त्यावरून लक्षात येते की चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि टी२० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा जडेजाही भाग होता. त्यामुळे त्याचा त्याबद्दल गौरव करण्यात आला.
आर अश्विनकडून टी२० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या शिवम दुबेचा गौरव करण्यात आला. त्याच्या ट्रॉफीमध्ये टी२० वर्ल्ड कप कोरलेला आहे.