शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांमुळे मंदिर परिसर नेहमीच गजबजलेला असतो. इथं येणारा भाविक श्रद्धेपोटी कुत्र्यांना मायेनं प्रसादातील गोड पदार्थ खाऊ घालतात. मात्र हीच माया आता कुत्र्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरताना दिसतेय.. शिर्डीतील साई मंदिर परिसरातील कुत्रे लठ्ठ होताना दिसतायत.त्यामुळे प्राणी प्रेमींमध्ये आता एक वेगळीच चर्चा सुरू झालीये.
शिर्डीतील कुत्रे कमालीचे लठ्ठ, सुस्तावलेले, त्वचारोगांनं ग्रासलेले
भाविकांना देण्यात येणारा मोफत बुंदी प्रसाद भाविक कुत्र्यांनाही देतात
मंदिर परिसराबाहेर पेढे, खडीसाखर सारखे अति गोड पदार्थ कुत्रे खातात
अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात जावून कुत्री लठ्ठ झाल्याचं निरिक्षण
व्यावसायिक वाढत्या कुत्र्यांच्या संख्येनं त्रस्त
शिर्डीत तशी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे..मुळातच साईबाबांनी आपल्या हयातीत मुक्या प्राण्यांची सेवा केली. भिक्षेत मिळणारं अन्न ते पक्षीप्राण्यांबरोबर वाटून खात. हाच भाव मनात ठेऊन भाविक आपल्याकडील प्रसाद इथल्या कुत्र्यांना खायला देतात..मात्र भूतदयेतून केलेली ही भाविकांची ही कृती मात्र कुत्र्यांच्या जीवावर उठलीय. त्यांमुळे भाविकांनी तारतम्य राखत आता कुत्र्यांना मधुमेही होण्यांपासून थांबवावं.