Bollywood News : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री एंजल रायच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. एंजलला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मुंबईतील बांगूरनगर भागात राहणाऱ्या एंजलने तिच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. तसेच तिने पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
एंजलला गेल्या बराच काळापासून जीवे मारण्याचा धमक्या सातत्याने येत आहेत. या सततच्या धमक्यांना कंटाळून तिने कायद्याची मदत घेण्याचं ठरवलं आहे. तिने एका व्यक्तीविरुद्ध खटलाही दाखल केला आहे.
एंजलने बांगुरनगर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला असून एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी अभिनेत्रीने दिलेल्या जवाबावरून गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं. यावरून पोलीस अधिक तपास करत आहेत.
एंजल रायने तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या अनेक दिवसापासून एक अज्ञात व्यक्ती टोला जीवे मारण्याची धमकी देत आहे, ईमेल मार्फत ही व्यक्ती तिला धमक्या पाठवत होती. याशिवाय तिला अश्लील मेसेजही येत होते. ही धमकी देणारी व्यक्ती तिला जिवंत जाळण्याची आणि कापून तुकडे करण्याची धमकी देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. जेव्हा पासून तिच्या आगामी घोटाला या वेबसिरींजचा ट्रेलर प्रदर्शित झालाय तेव्हापासून तिला धमक्या येण्याचं प्रमाण वाढल्याचं तिने सांगितलं.
पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम ७५,७८, ७९,३५१(३), ३५२, ३५६(२) आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तसंच सध्या पोलीस अभिनेत्रींचीही चौकशी करत असून अधिक तपास करत आहेत.