आयपीएलचा पहिला सामना होण्यापूर्वी या संघात मोठा बदल, झालं असं की…
GH News March 24, 2025 12:08 AM

आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून सामन्यांचा रंग चढू लागला आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सच्या संघात बदल झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला मेगा लिलावापूर्वी रिटेन केलं होतं. त्यामुळे आता त्याच्याऐवजी ऐन स्पर्धेच्या तोंडावर लखनौ सुपर जायंट्सला संघात बदल करणं भाग पडलं आहे. मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूला संघात घेतलं असून बीसीसीआयने बदलासाठी मंजुरी दिली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान गुडघ्याच्या लिगामेंटच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सच्या सराव शिबिरात गोलंदाजी करताना त्याच्या पायाच्या स्नायूंनाही दुखापत झाली. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 च्या पर्वातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी लखनौ सुपर जायंट्सने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचा समावेश केला आहे. शार्दुल ठाकुर मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता.

आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ‘लखनौ सुपर जायंट्सने डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातून बाहेर पडला आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला नोंदणीकृत उपलब्ध खेळाडूंच्या गटातून त्याच्या 2 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर करारबद्ध करण्यात आले आहे.’ भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ठाकूरकडे आयपीएलचा मौल्यवान अनुभव आहे, त्याने पाच फ्रँचायझींसाठी 95 सामने खेळले आहेत.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूरला खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नव्हता. पण लखनौ सुपर जायंट्सने त्याला संधी दिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली खेळी आहे. त्यामुळे तो चांगल्या फॉर्मात आहे. त्याचा नक्कीच लखनौ सुपर जायंट्सला होणार आहे.. लखनौचे आणखी दोन गोलंदाज या हंगामातून बाहेर पडण्याचा वेशीवर आहेत. मयंक यादव आणि आकाश दीप हे देखील अद्याप संघात सामील झालेले नाहीत. हे खेळाडू सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.