Illegal Liquor : रिसोड पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई; अवैध दारुविक्रीवर करडी नजर, २२ लाखांवर मुद्देमाल जप्त
esakal March 25, 2025 03:45 PM

रिसोड : रिसोड पोलिस ठाण्यात खांदेपालट झाल्यानंतर ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी अवैध व्यवसायावर कारवायाचा सपाटा लावला आहे. रिसोड शहरात पोलीसांनी अवैध दारु विक्रीवर कारवाई करत तब्बल २२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेली दहा दिवसांत रिसोड पोलिस स्टेशन कडून रिसोड शहर व ग्रामीण भागातील विविध प्रकरणात यामध्ये अपहरण, मिसिंग चे प्रकरणाचा तपास लावून मिसिंग परिवारांच्या स्वाधीन करणे व अपहरण मधील आरोपींना बेड्या ठोकणे यासह अवैध व्यवसायावर कारवाई सूरू आहे.वरली मटका जुगार अवैध देशी विदेशी दारू विक्री यावर धाडी टाकून ता. २२ रोजी तब्बल २२ लाख ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

रिसोड शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या या अनुषंगाने ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्याकडून कारवाई संदर्भात आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या अनुषंगाने रिसोड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या वाशीम नाका, बस स्टँड, मालेगाव नाका, चैतन्य काँप्लेक्स, सदानंद टॉकीज परिसरामध्ये धाडी टाकून सदर कारवाई करण्यात आली व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रिसोड शहरातील विविध हॉटेल ढाबे व दुचाकीवर होत असलेली अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी, नवदीप अग्रवाल, यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सहा.

पोलिस निरीक्षक शिवचरण डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, रामेश्वर नागरे, अशोक गिते, वसंत तहकिक, हवालदार महादेव चव्हाण, रतन बावस्कर, मंगेश मालवे, अंमलदार सुनील इंगळे, विश्वास चव्हाण, सुनील तिवाले, विनोद जायभाये, केशव चाटे, गणेश हाके, रूपेश मस्के, हेमंत सरकटे, तसेच डीबी पथकातील रवी अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे यांनी केली आहे.

रिसोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठे अवैध व्यवसाय सुरू असतील तर नागरिकांनी त्याची माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी. याबाबत गुप्तता पाळली जाणार आहे. तसेच अनेक अल्पवयीन मुले दारूची चोरटी वाहतूक करतात याबाबत पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे. अवैध व्यवसाया वर कारवाई सुरूच राहणार आहे. याबाबत नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.

- रामेश्वर चव्हाण, ठाणेदार रिसोड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.