मुंबई : सोन्याच्या तस्करी प्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरुच्या कॅम्पागोडा इंटरनॅशनल एअरपोर्ट वर पकडण्यात आलं होतं. मात्र, तिनं सोने तस्करी प्रकरणात सहभागी नसल्याचा दावा केला होता. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. विदेशातून भारतात सोनं घेऊन येण्यासाठी नियम आहेत. मात्र, भारतातून विमानातून विदेशात जाताना सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी नियम निश्चित करण्यात आलेले असतात. त्या नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते.
जेव्हा तुम्ही देश विदेशात विमानानं प्रवास करता त्यावेळी कोणत्याही अडचणीत सापडायचं नसल्यास काही नियम आणि मर्यादा माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही देशांतर्गत प्रवास विमानानं करत असाल तर तुम्हाला सोने घेऊन जाण्यासंदर्भातील कोणतेही नियम लागू नसतात. मात्र, मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यास तुम्हाला सीआयएसएफ आणि इन्कम टॅक्स यांच्या चौकशीला सामोरं जावं लागेल.
जर तुमच्याकडे 500 ग्रॅम पेक्षा जास्त सोनं असेल तर तुम्हाला सोनं खरेदीचं योग्य बिल द्यावं लागेल.जर तुमच्याकडे जास्त सोनं असेल तर ते जप्त केलं जाऊ शकतं, त्याशिवाय दंड द्यावा लागेल.
जर तुम्ही भारतातून विदेशात सोनं घेऊन जात असाल तर तुम्ही ज्या देशात सोनं घेऊन जात आहात तिथले नियम वेगवेगळे असू शकतात. यासाठी तुम्ही ज्या देशात भारतातून सोनं घेऊन जात आहात तिथलं सीमा शुल्क आणि कस्टमच्या नियमांची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्याकडील सोनं जप्त केलं जाऊ शकतं आणि दंड देखील द्यावा लागू शकतो.
रोख रकमेचा विचार केला असता विमानातून केवळ भारतात प्रवास करायचा असल्यास तुम्हाला तुमच्याकडे 50000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर त्याचा सोर्स द्यावा लागतो. जर तुम्ही सोर्स सांगू शकला नाही तर तुमची ती रक्कम जप्त होऊ शकते. याशिवाय जर तुमच्याकडे 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर तुमची कस्टमकडून चौकशी केली जाऊ शकते. तिथं तुम्हाला सोर्स सांगावा लागेल.
दरम्यान, भारतातून विदेशात पैसे घेऊन जायचं असेल तर भारतीय प्रवाशांना अडीच लाख रुपयांपर्यंतचं परकीय चलन घेऊन जाता येतं. त्याशिवाय अधिक रक्कम न्यायची असल्यास आरबीआयची परवानगी घ्यावी लागते.
इतर बातम्या :
टोल वसुलीचा विक्रम, टॉप 10 टोल प्लाझांनी फक्त 5 वर्षातच कमावले 14,000 कोटी रुपये
अधिक पाहा..