वाहन सेवा 30 टक्क्यांनी स्वस्त होणार? नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या
GH News March 26, 2025 04:13 PM

आता तुम्हाला कमी खर्चात चांगली वाहने मिळू शकतील. हो. हे भविष्यात सत्य ठरण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर वाहनाच्या सर्व्हिसिंगचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीमध्ये स्पेअर पार्ट बदलण्याची गरज भासल्यास तुमचा खर्च 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. तुम्ही म्हणाल, ‘हे कसं शक्य आहे?’ चला याविषयी आम्ही तुम्हाला पुढे विस्ताराने माहिती देत आहोत. याविषयावर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया.

आगामी काळात तुमच्या गाडीच्या दुरुस्तीचा खर्च कमी होऊ शकतो. तुमचा हा खर्च 30 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच याविषयावर भाष्य केले आहे. हे खरे असेल तर त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच होईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. येथे ते म्हणाले की, सरकारने आणलेल्या वाहन भंगार धोरणाचा योग्य वापर केल्यास देशातील वाहनांचे सुटे भाग 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकतात. यामुळे वाहनांच्या किमतीही कमी होऊ शकतात, ज्याचा फायदा शेवटी ग्राहकांनाच होणार आहे. त्यांना कमी खर्चात चांगली वाहने मिळू शकतील.

दुरुस्तीचा खर्च होणार स्वस्त

नितीन गडकरी यांचा मुद्दा खरा असेल तर त्याचा फायदा नव्या गाड्यांच्या किमती कमी होण्यातच होणार नाही. त्याऐवजी कंपन्यांना त्यांचे सुटे भाग कमी खर्चात तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे वाहनाच्या सर्व्हिसिंगचा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीमध्ये स्पेअर पार्ट बदलण्याची गरज भासल्यास तुमचा खर्च 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

ईव्ही आणि पेट्रोल वाहनांच्या किंमती समान

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी आणखी एका कार्यक्रमात म्हटले होते की, देशात येत्या 6 महिन्यांत इलेक्ट्रिक वाहने आणि पेट्रोल वाहनांच्या किंमती समान असतील. मंगळवारच्या कार्यक्रमात ते पुन्हा एकदा म्हणाले की, सरकार शहरे आणि महामार्गांवरील चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी काम करत आहे. सरकारच्या विविध पावलांमुळे बाजारात ईव्हीची मागणी वाढणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, या बदलामुळे कच्च्या मालाच्या किंमती कमी होतील. यामुळे ईव्हीची स्वीकारार्हताही वाढेल. सरकारने भंगार धोरण आणले आहे, ज्यामुळे वाहनांच्या पार्ट्सच्या किमती तब्बल 30 टक्क्यांपर्यंत कमी होतील. ऑटो कंपोनेंट्सच्या किमतींचा थेट परिणाम वाहनांच्या किमतींवर होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.