SRH vs LSG : हैदराबादचा सामना करण्यासाठी लखनौ प्लेइंग 11 मध्ये करणार बदल, या खेळाडूचा जाणार बळी!
GH News March 26, 2025 08:11 PM

आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा आता पार पडला आहे. प्रत्येक संघ एक सामना खेळला आहे. त्यात पाच संघांच्या पदरी निराशा, तर पाच संघांना पहिल्या सामन्यात यश मिळालं आहे. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. तर लखनौ सुपर जायंट्सने हातात असलेला सामना गमावला. दिल्ली कॅपिटल्सने एक गडी राखून शेवटच्या षटकात विजय मिळवला. आता लखनौ सुपर जायंट्सचा सामना बलाढ्य सनरायझर्स हैदराबाद संघाशी आहे. त्यामुळे या सामन्यातून विजयी कमबॅक करण्याचं आव्हान लखनौ सुपर जायंट्ससमोर आहे. पण पहिल्या सामन्यात हैदराबादने केलेली बॅटिंग पाहून भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असं असताना या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची दाट शक्यता आहे. कर्णधार ऋषभ पंत बॅटिंग लाइनअपमध्ये काही बदल करणार नाही. पण गोलंदाजीत बदल करण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली.

दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात लखनौच्या गोलंदाजीच्या चिंध्या उडाल्या होत्या. शार्दुल ठाकुर वगळता इतर गोलंदाज काही खास चालले नाही. प्रिंस यादवने सर्वाधिक धावा दिल्या. त्याने 4 षटकात 47 धावा दिल्या. तसेच एकही विकेट घेता आली नाही. दुसरीकडे, रवि बिश्नोईने 53 धावा देत 2 गडी बाद केले. शाहबाज अहमदनेही निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंत प्लेइंग 11 मध्ये बदल करेल असं सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये आवेश खानला संधी दिली जाईल. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रिंसच्या जागी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात लखनौची संभाव्य प्लेइंग 11

एडम मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत, डेविड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.