आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) मंगळवारी 25 मार्चला पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सवर 11 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. पंजाब विरुद्ध गुजरात हा मोसमातील पाचवा सामना होता. या सामन्यासह या हंगामातील पहिली फेरी पूर्ण झाली. अर्थात प्रत्येक संघाचा 1-1 सामना झाला. या पहिल्या फेरीनंतर 5 संघानी या हंगामात विजयाने सुरुवात केली. तर 5 संघांना विजयी सुरुवात करण्यात अपयश आलं.
गुजरात टायटन्सआधी या हंगामात लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स या संघाना आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर पंजाब किंग्स,दिल्ली कॅपिट्ल्स,चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयी सलामी दिली. या पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण आहे? हे जाणून घेऊयात.
पहिल्या फेरीनंतर आता पॉइंट्स टेबलसाठी चुरस रंगणार आहे. प्रत्येक सामन्यानंतर आता विजयी संघ पुढे जाईल, तर पराभूत संघाची पिछेहाट होईल. पंजाबने मंगळवारी गुजरातला पराभूत करत चेन्नईला दणका दिला. पंजाबने पहिल्याच विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. पंजाबच्या विजयामुळे चेन्नईची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच चेन्नई चौथ्या स्थानी आल्याने दिल्ली पाचव्या स्थानी आली आहे.दिल्ली गुजरात विरुद्ध पंजाब सामन्याआधी चौथ्या क्रमांकावर होती.
सनरायजर्स पहिल्या सामन्यानंतर अव्वल स्थानी आहे. हैदराबादने पाचव्या सामन्यानंतरही आपला पहिला क्रमांका कायम राखला आहे. दुसऱ्या स्थानी बंगळुरु विराजमान आहे. हैदराबाद आणि बंगळुरु या दोन्ही संघांच्या नेट रनरेटमध्ये काही पॉइंट्सचा फरक आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या सामन्यानंतर कोण कुठे?
त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने लखनौवर 1 विकेटने मात केली. त्यानतंर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स आठव्या स्थानी आहे. गतविजेता कोलकाता नवव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स शेवटून पहिल्या स्थानी अर्थात दहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे राजस्थान दहाव्या क्रमांकावर आहे.