मुरबाड, ता.२६ (बातमीदार)ः मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघामार्फत शासनाला विकलेल्या भाताची रक्कम टक्के शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करणे शक्य होणार नसल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाकडे ४,५७० शेतकऱ्यांनी १,०३,५०० क्विंटल भात शासनाला विकला आहे. त्यापैकी ३० जानेवारीपर्यंत भात विक्री केलेल्या २,०२८ शेतकऱ्यांना भाताची रक्कम मिळाली आहे. पण २,३४२ शेतकऱ्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत बँकेकडून घेतलेले पीक कर्ज परतफेड करता येणार नसल्याने व्याज भरण्याचा भुर्दंड पडणार आहे. बँकेकडून घेतलेले पीक कर्ज ३१ मार्चपर्यंत परतफेड केल्यास त्याचे व्याज शासनामार्फत भरले जाते. मुरबाड तालुक्यातील २,३४२ शेतकऱ्यांना २३ मार्चपर्यंत भातविक्री करून सुद्धा हक्काचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची परतफेड करता येणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
-----------------------------------------------------
मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाकडे ७,७२८ शेतकऱ्यांनी भात विक्रीसाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत ४,५७० शेतकऱ्यांनी १,०३,५०० क्विंटल भात विकले आहे. त्यापैकी २,०२८ शेतकऱ्यांना शासनाकडून पैसे मिळणे बाकी आहेत.
- रमेश घागस, व्यवस्थापक, मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघ