IPL 2025 DC vs SRH Live Streaming: दिल्ली सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, हैदराबाद कमबॅक करणार?
GH News March 30, 2025 02:06 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 20254) रविवारी 30 मार्चला डबल हेडरचा (Double Header) थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हैदराबादचा हा या मोसमातील तिसरा तर दिल्लीचा दुसरा सामना असणार आहे. दिल्लीने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सवर मात करत विजयी सलामी दिली होती. तर हैदराबादने राजस्थानवर मात केली. मात्र त्यानंतर हैदराबादला लखनौ सुपर जायंट्सकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे रविवारी हैदराबादचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला दिल्ली सलग दुसऱ्या विजयाच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना केव्हा?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना रविवारी 30 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कुठे?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवपर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपेड्टस जाणून घेता येतील.

सनरायझर्स हैदराबाद संघ: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, सिमरजीत सिंग, ॲडम झम्पा,सचिन बेबी, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, विआन मुल्डर, कामिंदू मेंडिस, राहुल चहर, अथर्व तायडे आणि एशान मलिंगा.

दिल्ली कॅपिटल्स संघ: जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, करुण नायर, डोनोवन फरेरा, त्रिपुराना विजय, दर्शन नळकांडे, दुष्मंथा चमीरा, केएल राहुल, टी नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल आणि माधव तिवारी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.