रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. आरसीबीसाठी कर्णधार रजत पाटीदार याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. रजतने अर्धशतक केलं. रजत व्यतिरिक्त विराट कोहली, फिलिप सॉल्ट आणि देवदत्त पडीक्कल या त्रिकुटानेही महत्त्वाची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी टीम डेव्हिड याने 20 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार ठोकून आरसीबीला 190 पार पोहचवलं. आता सीएसके घरच्या मैदानात हे विजयी आव्हान पूर्ण करणार का? याकडे यलो आर्मीचं लक्ष असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना आणि खलील अहमद.