Disha Salian : 'या' सेलिब्रेटीच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, केला धक्कादायक खुलासा
Saam TV March 29, 2025 01:45 AM

मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सध्या वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. पोलिसांनी आता दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला होता.

काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट सबंधित असलेल्या मिलिंद सोमण आणि चा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. दिशा पटाणी आणि मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद करण्याची आणि बोलणी ठेवण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटाणीने नकार दिल्याने दिशा सालियान तणावात होती.

मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्ठात आल्याने मी केलेलं ट्वीट डिलीट करणार नाही, अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा तणावात होती हेही एक कारण आहे.

दरम्यान, वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.