दोन कप -थंडगार दूध
दोन टेबलस्पून - रोझ सिरप
दोन टेबलस्पून -फालुदा शेवई
एक टेबलस्पून -साबुदाण्याचे बीज
एक स्कूप व्हॅनिला किंवा कुल्फी आईस्क्रीम
चिरलेले बदाम आणि पिस्ता
अर्धा टीस्पून -गुलाबजल
एक टीस्पून -साखर
ALSO READ:
कृती-
सर्वात आधी साबुदाण्याची बीज कमीतकमी पंधरा मिनिट पाण्यात भिजवा. आता एका ग्लासमध्ये गुलाब सिरप आणि थंडगार दूध घाला आणि चांगले मिसळा. आता त्यात उकडलेले फालुदा शेवया आणि भिजवलेले साबुदाणे बीज घाला. त्यावर व्हॅनिला किंवा कुल्फी आईस्क्रीमचा एक स्कूप घाला. चिरलेले बदाम आणि पिस्त्याने छान असे सजवा.तसेच आणखी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात गुलाब पाकळ्या, गुलाब जेली किंवा टुटी-फ्रुटी घालू शकता. तसेच थोडे थोडे चॉकलेट सिरप देखील घालू शकतात. जर तुम्हाला क्रिमी आवडत असेल तर तुम्ही दुधात थोडे कंडेन्स्ड मिल्क देखील घालू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: