आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) नवव्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या सामन्यातील बंदीनंतर हार्दिक पंड्या आता मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर युवा शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता कोणता संघ विजयाचं खातं उघडते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शनिवारी 29 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. क्रिकेट चाहते मराठीसह अनेक भाषेत कॉमेंट्रीचा आनंद घेऊ शकतात. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याबाबत लाईव्ह अपडेट जाणून घेऊ शकता.
गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.