जालना : ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असे सांगत एकाने बारा लाखांचा गंडा घातल्याची तक्रार तालुका जालना पोलिसांकडे करण्यात आली. हा प्रकार २३ ऑक्टोबर २०२४ ला घडला.
बीड येथील बदामराव नलवडे, भागवत देवडे, अमोल भोसले, संदीप भोसले यांना येथील रतन लांडगे हा पैशांचा पाऊस पडतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार हे चौघे रतन लांडगेकडे बारा लाख रुपये घेऊन आले.
यातील ११ लाख ७० हजार रोख, ३० हजार ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले. पैसे दिल्यानंतर रतन लांडगे याने पैशांचा पाऊस पाडला, मात्र, पैशांची गोणी घेऊन या चौघांना त्याच्या खोलीबाहेर पडता आले नाही.
रतन लांडगेने बारा लाखांची फसवणूक केल्याचे चौघांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची चौकशी केली जात असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.