नाशिकहून आता देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु केली जाणार आहे. नाशिकवरुन आता देशांतर्गत अनेक ठिकाणी प्रवास करता येणार आहे. आता गोव्याहून पुढे कोईमतूरपर्यंत तुम्हाला विमानाने प्रवास करता येणार आहे. यामुळे अवघ्या काही तासातच तुम्ही कोईमतुरपर्यंत जाऊ शकणार आहे. यामुळे उटीला जाण्यासाठी सुलभता होणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
३१ मार्चपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु होणार आहे. यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदिगड, गुवाहाटी, कोइंबतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरु केली जाणार आहे.
देशातल्या सर्वच भागातील विमानसेवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. पर्यटनासह नाशिकच्या उद्योगांना देखील होणार फायदा होणार आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरुन ही सेवा सुरु होणार आहे. सध्या नाशिक ते गोवा अशी विमानसेवा आहे. आता त्यात २ एप्रिलपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, याबाबत इंडिगोने घोषणा केली आहे. कोईमतूर येथील विमानतळावरुन सकाळी १०.४० वाजला विमान निघणार आहे. त्यानंतर गोव्याला ते १२.३५ मिनिटांनी पोहचणार आहे. त्यानंतर ते १२.५५ वाजता नाशिकसाठी विमान जाणार आहे. यानंतर हे विमान २.४० वाजता नाशिकला पोहचणार आहे.
यानंतर पुन्हा विमान गोव्याला जाणार आहे. संध्याकाळी ६.१५ वाजता हे विमान गोवा येथून कोईमतूरला जाणार आहे. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हे विमान कोईमतूरला पोहचणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार अशी चार दिवस ही सेवा सुरु राहणार आहे.
यामुळे पर्यटनासोबत उद्योगक्षेत्राताला देखील चालना मिळणार आहे. कोईमतुर हे औद्योगिक केंद्र असणारे शहर आहे. येथील यंत्रसामग्री नाशिकच्या कारखान्यांमध्ये वापरली जाते. त्यामुळे उद्योजकांना लाभ होणार आहे.