- आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी पर्यंत औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करीत हिंदुत्ववादी संघटनानी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता.
- त्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झालेली आहे. खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते त्यासोबतच औरंगजेबाची जिथे कबर आहे-
- औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Lonavala News: लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसरात बिबट्याचा वावर- लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी परिसरात बिबट्याचा वावर
-बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
-लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी आणि नागफणी सुळका या परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला आहे.
-तर एक व्यक्ती बिबट्यांची चाहूल लागताच थोडक्यात बचावलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-या भागात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच स्थानिकांना सावध राहण्याचे आणि रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
Nandurbar News: आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप114 कोटी रुपयांच्या गणवेश खरेदीची फाईल एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचे वितरण झाल्याचा आरोप...
एक कोटी रुपयाचा वरची खरेदी दर करारानुसार करू नये असा शासनाचा नियम असतानाही तत्कालीन आदिवासी विकास मंत्री यांनी घातला गणवेश खरेदीचा घाट
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या दहा हजार गाईंची ही चौकशी करण्यात यावी सेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी...
नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप...
नंदुरबार जिल्ह्यात भाजपा आमदार विजयकुमार गावित आणि शिंदे गटात रंगणार आरोप प्रत्यारोपांचा खेळ....
Shirdi News: साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावे - सुजय विखेशिर्डीच्या साई मंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावे.. त्यासाठी साई संस्थाने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे..
Nagpur News: पीएम मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर असणार आहे.
- माधव नेत्रालयाच्या 5.83 हेक्टर वर असलेल्या विस्तारित 250 बेडेड रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंगचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच एकाच मंचावर असण्याचा राम मंदिर नंतरचा हा ऐतिहासिक क्षण असणार आहे.
- माधव नेत्रालयात या निमित्ताने कार्यक्रमाच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे..
- त्यासाठी भव्य असा डोम उभारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर विमानतळावर आल्यानंतर सर्वात प्रथम हेडगेवार स्मृती मंदिर येथे जाऊन गोडवलकर गुरुजी आणि हेडगेवार यांच्या स्मृतीला वंदन करतील.