कुणाल कामराच्या विडंबन गीतावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून काही आम्ही बोलू नये का? असा सवाल करत आम्हालाही मोदी-शाह हे महाराष्ट्राचे शत्रू वाटतात, असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Beed Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली खाजगी रुग्णालयात उपचार सुरूमराठा समाजाच्या मेळाव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना जरांगे पाटलांसह धनंजय देशमुख आणि महिला शिक्षिका गहिवरल्या. याच कार्यक्रमात जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, घेणार तुळजाभवानी मातेचे दर्शनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर असून ते तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. तसेच तुळजाभवानी मंदीर जिर्णोद्धार कामाची पाहणीही करतील. यावेळी त्यांचा तुळजापूरात होणार भव्य सत्कार होणार आहे. दरम्यान तिर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापुरात ड्रग्स तस्करी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे या ड्रग्सप्रकरणी ते काय भुमीका घेणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mahavitaran News : महावितरणची वीज 1 एप्रिलपासून 10 टक्के स्वस्त होणारमहावितरणने राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर सुनावणी झाली असून महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने नवे वीज दर जाहीर केले आहेत. आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाप्रमाणे आता महावितरण कंपनीची वीज 10 टक्क्यांनी स्वस्त होणार असून यामुळे घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. हा आदेश 1 एप्रिलपासून लागू होईल.
Nashik Market Committee News : नाशिक बाजार समितीत आता महायुतीच्या नेत्यांमध्येच राजकीय शत्रुत्व टोकालानाशिक बाजार समितीच्या सत्तांतरानंतर संचालक मंडळाची पहिली बैठक शुक्रवारी (ता.29) झाली. या बैठकीत नियमित कामकाजापेक्षा राजकीय हेवेदाव्यांवरच भर दिला होता. त्यामुळे आगामी कालावधीत बाजार समितीत राजकीय सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. तर पिंगळे विरुद्ध चुंभळे असा संघर्ष सुरू झाला आहे.
Raj Thackeray News : गुढीपाडवानिमित्त मनसेची उद्या (ता.30) जाहीर सभागुढीपाडव्याला रविवारी (ता.30) मनसेची जाहीर सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा पार चिखल झाल्याची जहरी टीका राज ठाकरे यांनी याआधीही केली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सभेत ते कोणत्या विषयात हात घालतात. आपल्या टीकेचा दाणपट्टा फिरवणार कोणावर फिरवतात हे पाहावं लागणार आहे.
Girish Mahajan politics News : अंदर की बात; साधूंच्या अव्वाच्या सव्वा मागण्यांनी मंत्री महाजन सावध!जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तयारीची बैठक झाली. बैठक प्रामुख्याने स्थानिक साधू आणि महंतांची होती. मात्र त्यात स्थानिक साधूंमध्येच मतभेद आणि गोंधळ दिसला.
Earthquake in Myanmar News : म्यानमारमध्ये भूकंपाचा कहर! 144 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमीम्यानमारमध्ये शुक्रवारी (ता.२८) आलेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे कहर पाहायला मिळत आहे. येथे भूकंपांमुळे मोठं नुकसान झालं असून आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 700 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आणि जखमींचा हा आकडा वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान म्यानमारला मदतीचा हात भारताने दिला असून मदत पोहचवली जातेय. तसेच म्यानमारने आणीबाणी जाहीर करताना आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.
Ajit Pawar : 'मलिदा गँगने हैराण केलंय'; अजितदादांचा भर स्टेजवर संतापराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.29) बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळेंसह युगेंद्र पवारांना लक्ष केलं. तसेच ठेकेदार आणि पुढाऱ्यांनाही झापलं. यावेळी अजित पवार यांनी मलिदा गँगने मला नकोसं केलं असून एकतर पुढारपण करा, अन्यथा कॉन्ट्रॅक्ट बघा असा दम भरत संताप व्यक्त केला आहे. सध्या त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा सुरू आहे.
CM Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावरराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर असून ते येथे विठ्ठलाचे दर्शन घेतील. यानंतर ते तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सादरीकरणाची पाहणीही करणार आहे. याबरोबर ते तुळजापूर आणि नीरा नरसिंगपूरमध्ये जावून देवदर्शन घेतील.