इंदापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील त्यांचं कुलदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेणार आहेत.अगदी काही वेळातच मुख्यमंत्री फडणवीस हे नरसिंहपूर येथे दाखल होणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील नरसिंहपूर या ठिकाणी मंदिरात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं, त्याचबरोबर उपस्थितांनी भुवया उंचावल्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील रिंगणात होते आणि महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांची लढत झाली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याआधी त्यांच्या स्वागतासाठी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन उपस्थित राहिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे, त्यांनी नीरा नरसिंहपूर येथील मंदिरात जात उपस्थित कार्यकर्त्यांची भेट घेतल्याचं आणि देवाचं दर्शन घेतल्याचं दिसून आलं. मात्र, फडणवीस यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील नरसिंहपूर या ठिकाणी मंदिरात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरमध्ये येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या कामाची स्थिती काय आहे हे जाणून घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला.
आज सकाळी 10:20 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन.
सकाळी 10.25 वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूर जिल्हा धाराशिव कडे प्रयाण.
सकाळी 11:45 वाजता तुळजापूर येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर जिल्हा सोलापूर कडे प्रयाण.
सकाळी 12:10 वाजता जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आगमन.
दुपारी 12.15 वाजता मोटारीने हेलिपॅड येथून मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडे प्रयाण.
दुपारी 12.25 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन व दर्शन.
दुपारी 12.50 वाजता विठ्ठल मंदिर येथून शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण.
दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण, जिल्हाधिकारी सोलापूर?
दुपारी 1.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थान कडे प्रयाण.
दुपारी 2.10 वाजता मोटारीने पंढरपूर रोपवाटिका हेलीपॅड कडे प्रयाण
दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने नीरा नरसिंगपूरकडे प्रयाण.
अधिक पाहा..