मुंबई : एकीकडे राज्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने लावली आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने मुंबई, पुण्यासह काही भागांमध्य अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवार 1 एप्रिलपासून मुंबईसह पुणे आणि विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये अवकाळीची शक्यता आहे. तसेच, येत्या काळात एप्रिल ते जून या कालावधीमध्ये भारतासह राज्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते. (IMD Alert to Mumbai Pune and rest maharashtra predicted heavy rain and hailstorm)
हेही वाचा : Shivsena UBT : पंतप्रधान मोदींच्या निरोपाची घडी आली, राम-कृष्णही आले गेले…; ठाकरेंनी तारीखच सांगितली
राज्यात मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. IMD च्या अंदाजानुसार मंगळवारपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे.
एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट असणार आहे. तर राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात एप्रिलमध्ये उन्हाळी पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे आंबा पिकाच्या मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यासह पुढील 3 महिन्यांच्या हवामानाचा अंदाज आयएमडीने सोमवारी जाहीर केला. या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात आणि एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात दिवसा तसेच रात्री तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळचा दक्षिण भाग या ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राज्यात तसेच देशात कमाल तापमान सरासरीच्या वर राहू शकते. याच काळात देशाच्या बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाण्याची शक्यता अधिक आहे.