रतन टाटा वारसा: रतन टाटा यांच्या (Ratan Tata) मृत्यूपत्रानुसार त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान करण्यात आला आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 3,800 कोटी रुपये आहे, ज्यात टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्यातील मोठी रक्कम ही ‘रतन टाटा एन्डॉवमेंट फाऊंडेशन’ आणि ‘रतन टाटा एन्डॉमेंट ट्रस्ट’ यांना देणगी देण्यात आली आहे. ही रक्कम समाजसेवेसाठी वापरली जाणार आहे. (Ratan Tata)
त्यांच्या इतर मालमत्तेपैकी एक तृतीयांश (सुमारे 800 कोटी रुपये), ज्यात बँक एफडी, आर्थिक साधने, घड्याळे आणि पेंटिंग यांचा समावेश आहे, त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय यांच्याकडे जाईल, तर एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता या टाटा समूहाच्या माजी कर्मचारी आणि रतन टाटा यांच्या निकटवर्तीय यांना दिला जाईल.
रतन टाटा यांचा भाऊ जिमी नवल टाटा (वय 82) यांना जुहू बंगल्याचा वाटा मिळेल, तर त्यांचा जवळचा मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागची मालमत्ता आणि तीन बंदुका (25 बोअरच्या पिस्तूलसह) मिळतील.
रतन टाटा यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी 12 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे, ज्यातून प्रत्येक प्राण्याला दर तीन महिन्यांनी 30,000 रुपये मिळतील. त्यांचे सहाय्यक शंतनू नायकुडू यांचे विद्यार्थी कर्ज आणि शेजारी जेक मलाईते यांचे व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आले आहे.
रतन टाटा यांच्या विदेशी संपत्तीमध्ये (सुमारे 40 कोटी रुपये) सेशेल्समधील जमीन, वेल्स फार्गो आणि मॉर्गन स्टॅनली येथील बँक खाती आणि कंपन्यांमधील शेअर्स यांचा समावेश आहे. त्यांची 65 मौल्यवान घड्याळे (Bvlgari, Patek Philippe, Tissot इ.) देखील इस्टेटमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार सेशेल्समधील जमीन ‘आरएनटी असोसिएट्स सिंगापूर’कडे जाईल. जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळतील, तर सायमन टाटा आणि नोएल टाटा यांना उर्वरित जुहू मालमत्ता मिळेल.
मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांनी लिहिले की, ही मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे आणि आशा आहे की, हे ठिकाण त्यांना एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल. न्यायालयात मृत्यूपत्राची पुष्टी झाल्यानंतरच मालमत्तेची विभागणी केली जाईल, ज्यासाठी 6 महिने लागू शकतात.
अधिक पाहा..