आयपीएल 2025 मधील नववा सामना आज (29 मार्च) रोजी खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. दोन्ही संघांनी हंगामाची सुरुवात पराभवाने केली आहे. अश्या परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
हार्दिक पांड्या परतल्याने तो संघाचे नेतृत्व करत आहे. शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने कर्णधारपद स्वीकारले होते.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
मुंबई – रोहित शर्मा, रायन रायकल्टन (विकेटकीपर), टिळ वर्मा, सूर्यकुमार यादव, मुजीब उर रेहमान, हार्दिक पांड्या (कर्नाधर), नामन धार, दीपक चार, ट्रेंट बोल्ट, मिशेल सांतर, सत्यानारायण राजु
गुजरात – शुबमन गिल (कर्नाधर), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतीय, मोहम्मद सिराज, रशीद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा,
हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत गुजरात आणि मुंबई यांच्यात पाच सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गुजरातने तीन वेळा विजय मिळवला आहे, तर मुंबई संघाला दोन सामन्यांमध्ये यश मिळाले आहे.