मुंबई : नवीन वर्षात टाटा पॉवर (Tata Power Electricity) ग्राहकांना एक दिलासादायक बातमी देणार आहे. ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहून, टाटा पॉवर आपल्या 8 लाख निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना अधिक परवडणारी आणि शाश्वत वीज पुरवण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजूर केलेली दर रचना लागू करेल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष 2025-26 ते आर्थिक वर्ष 2029-30 साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, शहराच्या उपनगरीय भागात टाटा पॉवरचे 0-100 kWh आणि 100-300 kWh श्रेणीतील दर कमी राहणार आहेत.
टाटा पॉवर वीज दरांची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये
टाटा पॉवर ही मुंबईची सर्वात परवडणारी आणि विश्वासार्ह वीज कंपनी आहे. टाटा पॉवरच्या सरासरी दरांमध्ये हळूहळू कमी होत जाणारे आहेत जे कि 9.17 रुपये प्रति kWh वरून 2029-30 या आर्थिक वर्षांमध्ये 6.63 रुपये प्रति kWh पर्यंत कमी होईल, याचाच अर्थ पाच वर्षांत 28 टक्के कपात दर्शविते . टाटा पॉवरचे सरासरी वीजदर इतर वितरण परवाने असलेल्या कंपन्यांच्या सरासरी वीज दरांपेक्षा खूप कमी आहेत.
मुंबईच्या उपनगरातील 0-100 kWh आणि 100-300 kWh श्रेणीमध्ये कमी वीज दर, आर्थिक वर्ष 2026 मध्ये सध्याच्या दरांपेक्षा सुमारे 10 टक्के सरासरी घट.
पाच वर्षांत एकूण वीज खरेदीमध्ये हरित उर्जेचा वाटा सध्याच्या 39 टक्क्यांन वरून सुमारे 70 टक्क्यांपर्यंत वाढेल. हरित ऊर्जेचा दर सध्याच्या 0.66 रुपये प्रति kWh वरून 0.25 रुपये प्रति kWh एवढा कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहक ग्रीन प्रमाणपत्रांचा लाभ घेऊ शकतील.
100 टक्के हरित ऊर्जा असलेल्या डेटा सेंटरना व्हीलिंग शुल्कावर 10 टक्के सूट मिळेल.
ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा ऑडिट, ईव्ही चार्ज, डिमांड रिस्पॉन्स उपक्रम, वॉटर पंपिंग लोड शिफ्टिंग अशा विविध योजनांसाठी वीज नियामक आयोगाने पाच वर्षात सुमारे 48 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. टाटा पॉवर आपल्या ग्राहकांशी सहकार्य करून पीक पॉवरचे ऑप्टिमायझेशन आणि ग्राहकांसाठी ऊर्जा कार्यक्षमता सुनिश्चित करेल.
स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीमुळे १० किलोवॅटपेक्षा कमी भार असलेल्या निवासी ग्राहकांना ToD लाभ मिळू शकतात, हे एक अग्रगण्य असे पाऊल आहे, जे ग्राहकांना सौर तासांमध्ये वीज वापरण्यास आणि त्यांच्या वीज बिलांचे ऑप्टिमायझेशन करण्यासाठी अतिरिक्त सवलत मिळवण्याची संधी देईल
ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी डिमांड चार्जेसची लागू होणारी अट काढून टाकण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना अधिक किफायतशीर दराने वीज मिळू शकेल. हे “वापर आणि पैसे भरा” या सिंगल पार्ट वीज दरामुळे ईव्हीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळेल.
आर्थिक वर्ष 2026
युनिट जुने दर नविन दर
0 ते 100 5.33 4.76
101 ते 300 8.51 7.96
301 ते 500 14.77 13.55
500 वर 15.71 14.55
आर्थिक वर्ष 2027
युनिट नेव्हिन दर
0 ते 100 4.30
101 ते 300 7.10
301 टीई 500 11.64
500 वर 12.64
आर्थिक वर्ष 2028
युनिट नेव्हिन दर
0 ते 100 4.23
101 टीई 300 6.86
301 टीई 500 11.37
500 वर 12.37
आर्थिक वर्ष 2029
युनिट नेव्हिन दर
0 ते 100 4.13
101 टीई 300 6.78
301 टीई 500 11.47
500 वर 12.47
आर्थिक वर्ष 2030
युनिट नेव्हिन दर
0 ते 100 4.03
101 ते 300 5.96
301 ते 500 10.91
500 वर 11.91
अधिक पाहा..