MI Vs GT – रोहित शर्माने इतिहास रचला, असा विक्रम करणारा ठरला पहिला हिंदुस्थानी
Marathi March 29, 2025 11:24 PM

IPL 2025 मधील 9वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. हा सामना रोहित शर्मासाठी खास ठरला आहे. रोहित शर्माचा हा टी20 कारकिर्दीतला 450वा सामना ठरला आहे. यासोबतच त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

सर्वाधिक टी20 सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्माने मुसंडी मारली आहे. गुजरातविरुद्ध मैदानात उतरताच त्याने इतिहास रचला आहे. रोहित शर्मा 450 टी-20 सामने खेळणार पहिला हिंदुस्थानी ठरला आहे. याबाबतीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 412 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतीत केरॉन पोलार्ड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण 695 टी-20 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहित शर्मा 450 टी20 सामने खेळणारा 12 वा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि दमदार खेळाडू म्हणून आपला दबदबा कायम ठेवला आहे. 2024 चा वर्ल्डकप सुद्धा टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वातच उंचावला होता. त्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु आयपीएलमध्ये तो खेळताना दिसणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.