Pm Narendra Modi Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, संघ मुख्यालयात लावणार हजेरी
Marathi March 30, 2025 12:24 PM

PM Narendra Modi Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, संघ मुख्यालयात लावणार हजेरी

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सोबतच पंतप्रधान नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देणार आहे. त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष सुरु असताना पंतप्रधानाच्या या दौर्‍याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात करत जोरदार तयारी केली आहे. अशातच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा दिसून येत असून या बॅनर्सची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.