Panchang 30 March 2025: आजच्या दिवशी 'श्री सूर्याय नमः' या मंत्राचा किमान 108 जप करावा
esakal March 30, 2025 01:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० मार्च २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  चैत्र ९ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:३५

☀ सूर्यास्त -१८:४५

चंद्रोदय - ०६:५६

⭐ प्रात: संध्या - स.०५:१९ ते स.०६:३५

⭐ सायं संध्या -  १८:४५ ते २०:०१

⭐ अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१६

⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:११

⭐ निशीथ काळ - २४:२१ ते २५:१०

⭐ राहु काळ -  १७:१३ ते १९:४५

⭐ यमघंट काळ - १२:३६ ते १४:०८

⭐ श्राद्धतिथी -  प्रतिपदा-द्वितीय श्राद्ध

सर्व कामांसाठी सायं.०७:३९ प. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०७:१७ ते स.१०:३३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी कोहळा खावू नये .

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:३३ ते ११:०५

अमृत मुहूर्त-- ११:०५ ते १२:३६

विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास १४:३९ नं. गौरीसंनिध, काम्य शिवोपासनेसाठी १४:३९ नं. प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष -   शुक्ल

तिथी - प्रतिपदा(१४:३९ प.नं. द्वितीया)

वार -   रविवार    

नक्षत्र -  रेवती (१८:२७ प.नं. अश्विनी)

योग -  ऐंद्र (१९:३९ प.नं. वैधृती)

करण - बव(१४:३९ प. नं. बालव)

चंद्र रास - मीन(१८:२७ नं.मेष)

सूर्य रास - मीन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- विश्वावसु संवत्सरारंभ, वासंतीयनवरात्रारंभ, गुढीपाडवा, अभ्यंगस्नान, श्रीरामनवरात्रारंभ, घटस्थापना सूर्योदय ते स. १०.३५, निंबपत्रभक्षण, वायुपरीक्षण, संवत्सराधिती सूर्यपूजन, ब्रह्मदेव पूजन, पंचांगस्थ गणपती पूजन, आरोग्यतिलकविद्याव्रत, प्रपादानम्, अग्नीस दवणा वहाणे, सर्वेषाम् दर्शष्टिः, चंद्रदर्शन मु. ३०, समसंज्ञक, दक्षिणशृंग (दुर्भिक्षकर), चंद्रास्तः १९.५३, चंद्रव्रत (निशामुखेबालेन्दुपूजनं), पंचक समाप्ती १८.२७, चांद्रवसंतर्तु प्रारंभः, प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध, सर्वार्थसिद्धियोग १८.२७ नं

  या दिवशी पाण्यात गंगाजल व तीळ टाकून अभ्यंगस्नान करावे.

  आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.

  ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस गहु दान करावे.

  दिशाशूल पश्चिम दिशेस असल्याने पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गाईचे तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन , कन्या , तूळ , मकर , मीन या राशींना सायं.०६:२७ प .चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.