प्रशांत कोरटकर याची पोलिस कोठडी संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यानंतर प्रशांत कोरटकर याच्या वकिलाने लगेचच जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. न्यायालय त्याच्या जामिनावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
Shirdi Saibaba Sansthan : साई संस्थानचा मोठा निर्णय : साईभक्तांना मिळणार आता पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षणशिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने घेतलाय. मात्र साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
PM Modi in Nagpur : पंतप्रधान मोदी नागपुरात दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी ते आज नऊ नंतर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आगमन दाखल झाले आहेत. यानंतर ते दीक्षाभूमी येथे जाणार आहेत. तर 10 वाजता माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर ते सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला भेट देतील.
ST Bub : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे विभागाला नवीन 40 लालपरी बसमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी खरेदी करण्यात आल्या आहेत. यापैकी नवीन 40 लालपरी बस पुणे विभागाला मिळाल्या आहेत. 40 लालपरीमधून स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागाला प्रत्येकी दहा बसेस देण्यात आल्या आहे,
MNS Gudhi Padwa 2025 : शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईतील शिवाजी पार्क या मैदानावर पार पडणार आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Malegaon : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त मुख पदयात्राश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त मालेगाव शहरात भव्य मुखपदयात्रा काढण्यात आली. हातात पेटत्या मशाली घेऊन ही मुखपदयात्रा काढण्यात आली. यावेळी यावेळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण म्हणून आज मुख पदयात्रा काढली जाते. तसंच संपूर्ण दिवस उपवास करून संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.
PM Narendra Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते हेडगेवार स्मृतीभवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. शिवाय ते सरसंघचालक मोहन भागवत यांची रेशीमबागेत भेट घेणार असून मोदींच्या पूर्ण दौऱ्यात भागवत त्यांच्या बरोबर राहणार आहेत. या दौऱ्यात ते 33 कोटींहून जास्त किंमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत.